कोळी महासंघ
अध्यक्ष - रमेशदादा पाटील
अभिप्राय /
नांदेड या मराठवाड्यातील सीमावर्ती जिल्ह्यात आदिवासी कोळी कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा महर्षि वाल्मिकी सेवाभावी प्रतिष्ठान बिलोली जि. नांदेड या संस्थेचे अध्यक्ष गंगाधर कल्याणकर यांनी दि. २/२/२०१४शंकरराव सभागृह नांदेड येथे यशस्वी रीतीने संपन्न केला . गेल्या २-३ वर्षापासून वधुवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो .
नौकरी आणि व्यवसायाच्या कारणामुळे स्थलांतरित झालेल्या , एकमेकापासून दुरावलेल्या कोळी समाजातील आप्तस्वकीयांना एकत्रित आणून एकप्रकारे सामजिक ऐक्य निर्माण करीत आहात आपल्या कार्यक्रमामुळे सर्व स्तरातील कोळी समाजातील लोक एकत्र येतात , ओळखी होतात , विचारांची देवाण घेवाण होते व नकळत सामाजिक संघटन होते याचा बोध समाजातील युवा वर्ग सुद्धा घेऊन समाजकार्यासाठी पुढे येयील अशी आशा मला आहे.
आपण या मेळाव्यात नोंदणी केलेल्या उपवर वधूची माहिती पुस्तिकाही वितरीत करीत आहात त्याबद्दल मी कोळी महासंघ व व्यक्तिश; माझ्यावतीने आभिनंदन करतो. असेच सामाजिक कार्य करण्यास ईश्वर आपणास बुद्धी शक्ती दीर्घायुष देयील आपण करीत असलेल्या सामजिक उपक्रमास आणि प्रकाशित करीत असलेल्या
उपवरवधू माहिती पुस्तिका यास माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्या .
रमेशदादा पाटील
अध्यक्ष कोळी महासंघ


Comments
Post a Comment